प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातली सगळी मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पणं मंदिर बंद झाली असली तरी लॉकडाऊनमध्ये ५५ लाख भाविकांनी साईबाबांचं ऑनलाईन दर्शन घेतलं. तर साईबाबा मंदिर ट्रस्टला १ कोटी ८० लाखांची देणगी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दररोज सरासरी १ लाख ३८ हजार भक्त घरात बसून साईबाबांचं दर्शन घेत आहेत. वेबसाईट, मोबाईल अॅप आणि डिश टीव्हीच्या अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भाविक साईबाबांचं दर्शन घेत आहेतस अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. 


कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता १७ मार्चला साई मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलं. यानंतर १८ मार्च ते २६ एप्रिल या काळात साडेतीन लाख जणांनी साईबाबा संस्थेच्या वेबसाईटवरून साईबाबांचं दर्शन घेतलं. रोज सरासरी ८,७३४ भक्त वेबसाईटवर साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. 


साईबाबा संस्थेने बनवलेल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही साईबाबांचं दर्शन घेतलं जात आहे. जगभरात १ लाखांपेक्षा जास्त जणांनी हा ऍप डाऊनलोड केला आहे. रोज सरासरी २५ हजार भक्त या ऍपवरुन साईबाबांचं दर्शन घेतात, असं वक्तव्य डोंगरेंनी केलं आहे. 


डिश टीव्हीच्या माध्यमातून रोज एक लाखांहून जास्त जण साईबाबांचं दर्शन घेत आहेत. मार्च महिन्यात टीव्हीवरून दर्शन घेणाऱ्या जवळपास ४.५० लाख नव्या भक्तांची वाढ झाल्याचं संस्थानच्या आयटी विभागाचे प्रमुख अनिल शिंदे म्हणाले. एक भक्त रोज सरासरी २० मिनिटं साईबाबांचं दर्शन घेतो, असंही शिंदेंनी सांगितलं. 


लॉकडाऊनच्या काळात ४० लाख भक्तांनी टीव्हीवर घरातूनच साईबाबांचं दर्शन घेतलं. याशिवाय काही राष्ट्रीय चॅनल आणि असंख्य स्थानिक चॅनलही रेकॉर्ड केलेल्या साईबाबांच्या आरत्या दाखवतात. यातूनही असंख्य भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतल्याची प्रतिक्रिया अरुण डोंगरे यांनी दिली.