जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या सोलार कंपनीने हक्काच्या जमिनीचे पैसे दिले नाही म्हणून बोढरे येथील ५५ वर्षीय निलाबाई एकनाथ राठोड या महिलेने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवापूर शिवारात सोलार कंपनीचं काम सुरू आहे. सोलार कंपनीच्या या प्रकल्पात निलाबाई राठोड यांची २१ एकर जमीन गेलीय. १५ प्रती एकर असा भाव जमिनीला देण्याचं आश्वासन कंपनीने दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात केवळ ४ लाख ८० हजार इतकाच मोबदला देण्यात आलाय. 


वारंवार तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने अखेर निलाबाईंनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितलं.