नाशिक : जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ५७२ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ४५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून १९ रूग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक विरूद्ध मालेगाव असं चित्र उभं राहिलं आहे. नाशिक महापालिकेत ४४ रूग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये चांदवड, सिन्नर, दिंडोरी, निफाड, नांदगाव, येवला, सटाणा, मालेगाव ग्रामीण असे एकूण ६१ रूग्ण आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक ग्रामीणमध्ये ६१ रूग्ण आढळले असून नाशिक तालुक्यात ८, चांदवड ३, सिन्नर ५, दिंडोरी १, निफाड ५, नांदगाव २, येवला २५, सटाणा १, मालेगाव ग्रामीण ११ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर मालेगाव महापालिकेत एकूण ४४८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. 


राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या  १९ हजार ६३ झाली आहे. आज १०८९ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९ हजार ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


आज राज्यात ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७३१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील १० , जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूंपैकी १९  पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७  रुग्ण आहेत तर १६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.