मुंबई / नागपूर :  Heat Stroke Patients In Maharashtra : मान्सून अंदमानात दाखल झाल्याची चांगली बातमी असताना राज्यात उष्माघाताने चिंता वाढवली आहे. कधी एकदाचा पाऊस पडतो असे झाले आहे. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उष्माघातामुळे 29 जणांचा बळी गेले आहेत. दरम्यान, सर्वाधिक 460 रुग्ण नागपूरमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यापासून अनेक भागात उष्णतेची लाट होती. अद्यापही काही भागात उष्णेताची लाट  दिसून येत आहे. विदर्भात चांगलाच पारा वाढलेला दिसून येत आहे. राज्यात उष्माघाताच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, रुग्णांची संख्या 580 इतकी नोंदवण्यात आली आहे. मार्चपासून राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे 29 जणांचा बळी गेला आहे. तर, सर्वाधित 460 रूग्ण नागपूरमध्ये आढळून आले आहेत. 


नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे आहे. तर चंद्रपुरात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आता या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे.  विदर्भात 2 ते 3 डिग्री तापमान घटण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन-चार दिवसात काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. 


मान्सून केरळात लवकर पोहोचत असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलं. साधारण 1 जूनला मान्सून केरळात येतो. मात्र यंदा 27 मेला मान्सून पोहचेल. तसेच मुंबईत 10 जूनला मान्सून दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे उन्हामुळे त्रस्त जनतेचे पावसाकडे लक्ष आहे.