मुंबई : राज्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांती संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेय. आज कोरोनाच्या ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे एकूण रुग्णांची संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली आहे. तसेच आज १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८  नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


आज राज्यात २७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण मृतांची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


आज झालेल्या मृतांमध्ये १९ पुरुष तर ८ महिला आहेत. २७ मृतांपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


जिल्हा व मनपानिहाय रुग्ण आणि मृत्यू


मुंबई महानगरपालिका: ७०६१ (२९०)
ठाणे: ४८ (२) 
ठाणे मनपा: ४१२ (६)
नवी मुंबई मनपा: १७४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १६३ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १७
मीरा भाईंदर मनपा: १२६ (२)
पालघर: ४१ (१)
वसई विरार मनपा: १२८ (३)
रायगड: २४
पनवेल मनपा: ४१ (२)
ठाणे मंडळ एकूण: ८२४४ (३१३)


नाशिक: ६
नाशिक मनपा: २०
मालेगाव मनपा:  १७१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: ३० (८)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: ३१५ (२७)


पुणे:६३ (३)
पुणे मनपा: १११३ (८२)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: ९२ (६)
सातारा: ३२ (२)
पुणे मंडळ एकूण: १३७९ (९६)


कोल्हापूर: ९
कोल्हापूर मनपा: ५
सांगली: २८
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५३ (२)


औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १२९ (७)
जालना: २
हिंगोली: १५ 
परभणी: ०
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: १५० (७)


लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १९ (१)


अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १६९ (९)


नागपूर: ६
नागपूर मनपा: १३२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १४३ (२)


इतर राज्ये: २६ (२)


एकूण: १०,४९८  (४५९)