मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची संख्या आजही राज्यात वाढली आहे. आज ५९७ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ९९१५ वर पोहोचली आहे. आज राज्यात २०५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात १५९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज राज्यात ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये मुंबईचे २६, पुणे शहरातील ३, सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरातीस एकाचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये २५ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. ज्यामध्ये ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या १७ रुग्णांचा समावेश आहे. १५ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. १८ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगाची समस्या होती. राज्यात आतापर्यंत ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 


देशात कोरोना रूग्णांची संख्या 31 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1674 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशात एकूण रुग्णांची संख्या 31 हजार 332 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 7 हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. 


महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.