नागपुरात डेंग्यूचे ६ बळी, परिसरात दहशत
वाडी परिसरात महिन्याभरापासून डेंग्यूने थैमान घातले असून सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आलाय.
नागपूर : वाडी परिसरात महिन्याभरापासून डेंग्यूने थैमान घातले असून सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आलाय.
सहा बळी घेतल्यानंतर जागे झालेल्या वाडी नगर परिषद व जिल्हा आरोग्य विभाग युद्धपातळीवर कामाला लागले. मात्र सुरक्षा नगर दत्तवाडी तील एका इसमाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. देवेंद्र ठाकूर असे मृतकाचे नाव आहे.
यापूर्वी डेंगू आजाराने वाडी परिसरात पाच बळी घेतले आहेत यात शुभांगी वाघमारे व १२ वर्षीय संतोष दुपारे या मुलाचाही मृत्यू झाला आहे. एकाच परिसरात डेंग्यूने सहा मृत्यू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
वाडी परिसरातील १०० च्यावर डेंग्यूचे रुग्ण इतरत्र उपचार घेत असल्याची माहीती पुढे येत आहे.