नाशिकमध्ये पावसामुळे दोन भीषण अपघात, ६ जण ठार
नाशिकमध्ये 2 ठिकाणी पावसामुळे अपघात झाल्याने 6 जणांना जीव गमवावा लागला आहे.
योगेश खरे, नाशिक : मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. नाशिक जिल्ह्यात आज पावसामुळे २ ठिकाणी भीषण अपघात झाले.
दिंडोरी तालुक्यात आणि इगतपुरी तालुक्यात आज झालेल्या या दोन अपघातात 6 जण ठार झाले आहेत. महामार्गावर डिव्हायडरवर कार आणि कंटेरनरचा अपघात झाल्याने तीन ठार आणि दोन गंभीर जखमी झाले आहेत.
दिंडोरी तालुक्यात झाड पडून अपघातात तीन जिल्हा परिषदेचे शिक्षक ठार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दोन अपघातात एकूण सहा जण ठार झाले आहेत.