सातारा : बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मंगेशला वाचवण्यासाठी यंत्रणेला अपयश आलंय. तब्बल ११ तास मंगेशला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास चिमुकला मंगेश खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला होता. माण तालुक्यातील विरळी गावात ही घटना घडली होती. 


एनडीआरएफच्या जवानांचे मंगेशला वाचवण्यासाठी ११ तासांचे शर्थीचे प्रयत्न फोल ठरले... त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं परंतु, तोपर्यंत मातीखाली गुदमरून मंगेशचा मृत्यू झाला होता...