Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत राज्यात सरकार स्थापन केले. यामुळे महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर माहाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे.  आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचे  तब्बल 6000 पानांचे लेखी उत्तर दिले आहे. यात  अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. 


विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीवर तब्बल 6000 पानांचं लेखी उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाने उत्तर सादर केलंय. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीवर तब्बल 6000 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्ष कोणत्या गोष्टींवर रजिस्टर झाला त्याचा खुलासा या उत्तरात शिंदे गटाने केला आहे. आता या उत्तराची पडताळणी केल्यावर विधानसभा अध्यक्षांकडून या सर्व आमदारांना सुनावणीसाठी बोलावलं जाणार आहे. 


शिंदे गट आणि ठाकरे गटाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितला होता. आता शिंदे गटाने हे उत्तर सादर केल्यावर सुनावणीला सुरूवात होईल. ठाकरे गटाच्या आमदारांची आधी सुनावणी होईल. ठाकरे गटाच्या आमदारांनी सादर केलेल्या लेखी उत्तरानुसार त्यांना विचारण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचं काम सुरू आहे.  कारवाईत दिरंगाई होणार नाही असं आश्वासनही नार्वेकरांनी दिले आहे.


आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या उत्तराची पडताळणी करून अध्यक्ष आमदारांना सुनावणीला बोलावणार आहे.  16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी योग्य ती कारवाई कायद्यानुसार आणि वेळेत करु असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले होते.  कारवाईत दिरंगाई होणार नाही असं आश्वासनही नार्वेकरांनी दिले होते. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करम्याची मागणी केलेय.