आज राज्यात कोरोनाचे 6555 रुग्ण वाढले, तर 151 रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले...
मुंबई : आज राज्यात कोरोनाचे 6555 रुग्ण वाढले आहेत. तर 3658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1,11,740 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.08 टक्के झालं आहे.
राज्यात आज 151 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर 4.27 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 86,040 लोकांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत राज्यात 11,12,442 नमुने पाठवण्यात आले. ज्यापैकी 2,06,619 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,04,463 लोकं होम क्वारंटाईन असून 46,062 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.