धक्कादायक माहिती, पॅरोलवर सोडलेले ६७५ कैदी फरार
तुरुंग प्रशासकाचा भोंगळ कारभार
नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हत्याचं सत्र सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव झी २४तास जगासमोर मांडल्यावर आता राजातल्या तुरुंग प्रशासकाचा भोंगळ कारभाराचा आणखी एक सशक्त पुरावा झी २४ तासच्या हाती लागला आहे. राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ पॅरोलवर सोडलेले कैदी फरार आहेत. विशेष म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे आहेत. विशेष म्हणजे यातील ४२७ फरार कैद्यांचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं धक्कादायक अहवाल झी 24 तासच्या हाती लागला आहे.
याव्यतिरिक्त राज्यात तीस जेल आहेत त्यातील माहिती अद्याप उपलब्ध नाही मात्र कुख्यात कैद्यांना सांभाळणाऱ्या कारागृहाच्या या कारभाराचा ही पोलखोल झी 24 तास करत आहेत. फोटो नसणे हा भोंगळ कारभाराचा अक्षम्य नमुना आहे. यामुळे राज्यातील कारागृहात काय सुरू आहे हे समोर येत आहे. यातील अनेक फरार कैदी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून फरार झाले असावेत असाही संशय व्यक्त होतो आहे.