अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ७ दरोडेखोरांना अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातल्या पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील महंडूळवाडी येथे दाबा धरून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या सातही आरोपींवर जिल्ह्यात तब्बल ९ गंभीर गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. महंडूळवाडी शिवारात एका हॉटेलवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हे आरोपी असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली. 


या सात आरोपींपैकी एक आरोपी मोक्काअंतर्गत असलेल्या गुन्ह्यात फरार होता. तर सातही आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यात १ जबरी चोरी आणि ८ घरफोडी असे तब्बल ९ गंभीर गुन्हे दाखल असून गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते.