7 years girl climbed 'Lingana' Fort: जर मनात चिकाटी आणि काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असेल तर वाटेतील कोणत्याच अडचणी आपल्याला अडवू शकत नाहीत आणि आपण आपल्याला हवं ते साध्य करु शकतो. अवघ्या 7 वर्षाच्या मुलीने हे सिद्ध केलं आहे. या मुलीने महाराष्ट्रातील सर करण्यास अतिशय कठीण असलेला लिंगाणा दुर्ग केवळ सातव्या वर्षी सर केला.


महाराष्ट्राची हिरकणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच अलिबागमध्ये राहणाऱ्या अवघ्या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील लिंगाणा किल्ला सर केल्याची बातमी समोर आली. शर्विका जितेन म्हात्रे हे तिचं पूर्ण नाव. इतकेच नव्हे, तर शर्विकाने आत्तापर्यंत 121 गड सर करत यशाचे शिखर गाठले. तिच्या या धाडसी कामगिरीमुळे तिला 'जागतिक वीक्रमवीर' आणि 'महाराष्ट्राची हिरकणी' असे नाव पडले. 


सर केला 'लिंगाणा' दुर्ग


खरंतर, लिंगाणा हा दुर्ग सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर वसलेला आहे. हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून प्रसिद्ध आहे. लिंगाणा दुर्ग हा स्वराज्याचे कारागृह म्हणूनही ओळखले जाते. या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट ही थरारक आणि अवघड आहे. परंतु, इतक्या अवघड गोष्टींवर मात करत शर्विकाने हा गड सर करुन यशाचे शिखर गाठले. हा गड सर करण्याच्या मोहिमेत तिच्यासोबत 16 गिर्यारोहकांच्या समावेश होता. 


हे ही वाचा: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; 'या' तारखेला होणार लोकार्पण


 


'या' संस्थेतुन घेतले प्रशिक्षण


हे दुर्ग सर करण्याच्या मोहिमेसाठी शर्विकाने पुण्यातील राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग या संस्थेत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाअंतर्गत तिला अमोल आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या संस्थेत ती दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. या प्रशिक्षणामुळेच तिच्यात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच, एस. एल. अ‍ॅडव्हेंचर, पुणे यांच्या माध्यमातून एव्हरेस्टवीर लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, गिर्यारोहक तुषार दिघे, केदार यांच्या मदतीने आणि सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने ही मोहिम यशस्वीरित्या पार पडली.