Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानला जीवे ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप याचा व्हॉट्स अप व्हिडिओ समोर आला आहे. अजच कश्यप समोरच्या व्यक्तीशी बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. यात  शूटर घेतल्याचं कश्यप सांगत असल्याचं उघड झालंय. तसंच या व्हिडिओतून अनेक धक्कादायक गोष्टीही समोर आल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खानला घरावर गोळीबारप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अजून एकाला अटक केलीये...पनवेल शहर पोलिसांनी ही कारवाई केलीये. दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी याला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.  दिपक हवासिंग गोगालिया उर्फ जानी वाल्मिकी असं त्याचं नाव आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 5 झाली आहे. जॉनी वॉल्मिकी बाहेरुन येणा-या आरोपींची राहण्याची तसंच गुन्ह्यासाठी वापरण्यात येणा-या वाहनांची व्यवस्था करणार होता. व्हिडिओ कॉलद्वारे तो या कटातील इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय. 


दबंग खान सलमानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. विश्नोई गँगनं सलमान खानच्या हत्येचा कट आखला होता.. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी बिश्नोई गँगनं सलमानच्या हत्येचा प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता.. सलमान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर असतानाच त्याच्यावर बिश्नोई गँग हल्ला करणार होती.. त्यासाठी पाकिस्तामधून शस्त्र मागवून त्या स्वंयचलित शस्त्रांनी हल्ला करण्याचाही कट आखण्यात आला होता. AK47, M-16 आणि AK-92 यासारख्या घातक शस्त्रांनी सलमानवर हल्ला केला जाणार होता.  या कटात 17जणं सहभागी झाले होते. यातील 4 जणांना अटक करण्यात आलीये.. या आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली.