औरंगाबाद : एक धक्कादायक बातमी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील बिडकीन गावातील. बिडकीन गावात तब्बल 71 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेची फसवणूक (71 farmers cheated banks for crop loans) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेला खोटे कागदपत्र दिली आणि बँकेतून तब्बल एक कोटी दहा लाखांचं कर्ज उचलले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मात्र बँकेच्या तपासणीत हा सगळा प्रकार पुढे आला आणि त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी या प्रकाराची माहिती बिडकीन पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार बिडकीन पोलिसांनी 71 शेतकऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


बिडकीन पोलीस आता या फसवणुकीचा पुढील तपास करणार आहे. मात्र 71 शेतकऱ्यांनी खोटे कागदपत्र दिले हे बँकेच्या सुरुवातीला लक्षात का आलं नाही आणि बँकेने कर्ज कसे दिले हे प्रश्न अनुत्तरित आहेत. तुर्तास फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.