शिर्डी : साईबाबांना दररोज किमान 1 कोटी रुपयांच दान साईभक्त करता त्यात उत्सवांच्या दिवशी अधिकच भर पडते. साईबाबांना रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने तब्बल 75 लाख रुपये किमतीच सोनं, तर 3 लाखाच्या वर धान्य साईभक्तांनी दान केलं आहे. रामनवमीच्या दिवशी, श्री.चन्‍ना रेड्डी यांनी ३२ लाख ३० हजार रुपये किंमतीच्‍या ११३३ ग्रॅम वजनाच्‍या सोन्‍याच्‍या पादुका संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे आणि सौ.नलिनी हावरे यांच्‍याकडे देणगी स्‍वरुप सुपुर्त केल्‍या आहेत.


धान्य देखील दान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर नागपूर येथील दानशुर साईभक्‍त विनायक गजानन मोखारे यांनी ६५ पोते गहु, २१ पोते तांदूळ, १० पोते साखर, ११ पोते चनादाळ व ११ डबे शेंगदाणा तेल आणि त्‍यांचे सहकारी नावदेव किसनजी महाकाळकर यांनी १ पोते साखर असा एकुण सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा किराणामाल संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिला आहे.


साईंना रामनवमी उत्सातील दिन दिवसात भक्त मोठया प्रमाणात रोख आणि देगणी पेटीत दान चढवतात या दानाची मोजणी येत्या मंगळवारी होणार असुन यातही दानाचा आकडा किमान तीन ते चार कोटीच्या दरम्यान जाणार आहे.