राज्यात अकरावीचे ७७ टक्के प्रवेश पूर्ण, ९३,६४५ विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
११ वीसाठी ३,२१, ९७९ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
मुंबई : ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यात सहा महापालिकेच्या अंतर्गत ७७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यातील एकूण ४,१५,६२४ विद्यार्थ्यांपैकी ३,२१, ९७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अजूनही जवळपास ९३,६४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. अकरावी प्रवेशाची दुसरी फेरीची मुदत आज संपत आहे. यानंतर आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरीची सुरुवात होणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात अजूनही ११ वीच्या ४३ टक्के जगा रिक्त आहे. यामुळे अजून २,३६,७९१ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. अजूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थिंची संख्या अधिक आहे. मुंबईतील ५८,३१८ विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही.
विभाग इनटेक - एकूण विद्यार्थी - प्रवेश - रिक्त जागा - प्रवेश न घेतलेले
मुंबई 3,20,390 - 2,44,608 - 1,86,290 - 1,34,100 - 58,318
नाशिक 25,270 - 24,147 - 17,014 - 8256 - 7133
अमरावती 15,360 - 11,987 - 10,099 - 5261 - 1888
नागपूर 59,250 - 36,072 - 31,682 - 27,568 - 4390
संभाजीनगर 31,470 - 19,013 - 15,514 - 15,956 - 3499
पुणे 1,07,030 - 79,797 - 61,380 - 45,650 - 18,417