मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये कोरोनावीरांचा देखील समावेश आहे. डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करत आहेत. या संकटाचा सामना करताना आतापर्यंत सात पोलिसांनी आपले प्राण गमावले असून तब्बल ७८६ पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे.  एकट्या मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. करोनाची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्सवस्थ वातावरण निर्णाण झालं आहे.



त्याचप्रमाणे राज्यात तब्बल तीन हजार पोलिसांना आयसोलेशन वॉडमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा फटना पोलिसांच्या कुटुंबाला देखील बसताना दिसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांनाही आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २० हजार २२८ रुग्ण आढळले आहेत. तर ७७९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे.