शिरवडे येथे एसटी-जीपच्या भीषण अपघातात ८ ठार
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवडे फाट्याजवळ एसटी आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला.
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवडे फाट्याजवळ एसटी आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जीप नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. जीप विरुद्ध बाजुने रस्त्यावर जावून एसटीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर पिंपळगाव बसवत येथे उपचार सुरू आहे.
चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्या सटाणा आगाराच्या एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये सहा महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. जीपमधील सर्वजण सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथे एका लग्नासाठी चालले होते.
अपघातातील मृतांची नावे
- धनुबाई केदा काकुळते (६५, किकवारी - सटाणा)
- रतना राजेंद्र गांगुर्डे (४५)
- शोभा संतोष पगार (४०)
- सिद्धी विनायक मोरे (१४)
- तेजस्री साहेबराव शिंदे
- कृष्णाबाई बापू शिंदे
- सरस्वतीबाई नथू जगताप
-अशोक पोपट गांगुर्डे