कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : कासारवाडी परिसरात एका फ्लॅटमध्ये फ्रीजच्या कॉम्प्रेसरला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. पण घरातल्या एका 8 वर्षीय मुलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तब्बल 6 जणांचा जीव वाचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कासारवाडी येथील सागर हाईट्स इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या डोमिनिक कदम यांच्या घराची स्थिती सध्या खराब आहे. काल रात्री घराला आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले. पण नशीब बलवत्तर म्हणून घरातल्या एकाला ही इजा झाली नाही. या घरात कदम पती पत्नी राहतात. पण सुट्टीमुळे त्यांची धाकटी मुलगी आणि त्यांची दोन मुले आणि थोरल्या मुलीचा मोठा मुलगा कदम यांच्याकडे आले आहेत. 


रात्री कदम यांच्या थोरल्या मुलीचा मुलगा मारवीन 1.45 च्या सुमाराला पाणी पिण्यासाठी उठला. त्याच वेळी त्याने फ्रीजच्या कम्प्रेसर मधून ठिणग्या पडताना पहिल्या. त्याने प्रसंगावधान दाखवत आजोबा डोमिनिक यांना उठवले. तोपर्यंत फ्रीजने पेट घेतला होता. आग वाढणार लक्षात येताच सर्व जण बाहेर पढले.


मारवीनला रात्री कधीच जाग येत नाही पण त्याला त्या दिवशी जाग आली. त्याला आमचा जीव वाचवण्यासाठीच ही जागा आल्याची भावना त्याच्या घरातले व्यक्त करत आहेत. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आलं. पण कदम यांचे लाखो रुपयांचे सामान आगीत खाक झाले.