Mumbai Crime News: मुंबईसारख्या गजबजलेल्या परिसरातही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जोगेश्वरी परिसरातून एक मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. 53 वर्षांच्या नराधमाने 8 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच इमारतीत राहतात. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून पॉक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Rape Case News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी आणि पीडिता एकाच इमारतीत राहत होते. दोघांच्या कुटुंबीयांमध्ये सलोख्याचे संबंधदेखील होते. चिमुकलीची आई कामावर जाताना तिला आरोपीच्या घरी सोडून जात होती. कारण घरी तिचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नव्हती. आईच्या याच असहायत्तेचा फायदा घेत आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केले आहेत. 


चिमुरडीला शेजाऱ्याच्या घरात सोडून आई कामावर निघून गेली. आई निघून जाताच आरोपीने ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने काही दिवस कोणालाच याबाबत सांगितले नाही. मात्र, आईला मुलीच्या वागण्यात बदल दिसून आल्याने तिने मुलीला जवळ घेऊन विचारपूस केली. तेव्हा मुलीने तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत आईला सांगितले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. 


मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आयपीसी कलम 376 आणि पॉक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 


लोणावळ्यात मुलीवर अत्याचार


चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नराधमाने एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने नऊ वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.