मुंबई : हे सरकार शेतक-यांचं आहे, असं राज्य सरकार म्हणत असलं तरी हे वास्तव नसल्याचं उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांसाठी केवळ घोषणा करणा-या या सरकारच्या सत्तेत गेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. म्हणजे महिन्याला ८० आत्महत्या मराठवाड्यात सुरु असल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय. त्यामुळे सरकार अजूनही शेतक-यांचे प्रश्न सोड्वण्यात अपयशी ठरत असल्याचं दिसतं.


सततच्या दुष्काळामुळं शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यात सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली खरी मात्र अजूनही शेतकरी कर्जमाफी कधी होणार याची वाट पाहत आहे. यामुळं सुद्धा शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, पीक कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना उभं करत नाही, अशात शेतकरी करणार तरी काय असा प्रश्न विचारला जातोय.


८०० आत्महत्या मध्ये सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत, १६७ शेतकऱ्यांनी तिथं आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारने केलेल्या कर्जमाफीचं काय झालं असाही प्रश्न विचारला जात आहे.