Kalyan Crime News: महाराष्ट्रातील कल्याण येथे एका 13 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केली आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाइड नोटदेखील लिहली आहे. यात त्याने शाळेतील शिक्षिका आणि काही विद्यार्थी त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. तर, विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने एक सुसाइड नोट लिहली आहे. या सुसाइड नोटमध्ये त्याने शिक्षक आणि काही विद्यार्थी त्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. रविवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह राहत्या घरात सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे. 


सुसाइड नोटमध्ये नेमकं काय? 


विद्यार्थ्यांने सुसाइड नोटमध्ये लिहलं आहे की, शाळेत आर्ट शिकवणाऱ्या शिक्षिका आणि इतर विद्यार्थी सतत त्रास देत आहेत. या सगळ्याला मी खूप वैतागलो आहे.  टीचर आणि एका विद्यार्थ्याने चिडवल्यामुळं मी आत्महत्या करतो आहे. पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागवू नका, असं त्याने चिठ्ठीत लिहलं आहे. 


कल्याणची चिकणीपाडा विघ्नेश त्याच्या कुटुंबासह राहत होता. रविवारी मुलाचे वडिल कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरात कोणी नसताना विघ्नेश याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे वडील जेव्हा कामावरुन परतले तेव्हा विघ्नेशचा मृतदेह घरात आढळला. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.