मुंबई : काही आठवड्यांपूर्वी ब्रेक द चेननुसार (Break The Chain) कोरोनाचा (Corona) ओसरता जोर पाहता निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सातत्याने दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात (Maharashtra Corona) दिवसभरात एकूण 9 हजार 974 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा दहा हजाराच्या खाली आहे. पण या आकड्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हा आक़डा लवकरच 10 हजारांचा टप्पा पार करण्याची भिती आहे. (9 thousand 974 new corona positive patients have been registered in Maharashtra today June 27 2021) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात दिवसभरात 8 हजार 562 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याता आतापर्यंत एकूण 57 लाख 90 हजार 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.91 % इतका झाला आहे. तर आज कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.0% इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 19 हजार 168 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत.तर 4 हजार 240 व्यक्ती संस्थातमक विलिगीकरणात आहेत.  


मुंबईतील आकडेवारी


मुंबईत (Mumbai Corona) 24 तासांमध्ये 746 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 295 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या एकूण 8 हजार 582 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुप्पटीचा दर हा 728 दिवसांवर पोहचला आहे.  



राज्यात सोमवारपासून निर्बंध 


राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने संपूर्ण राज्यात सोमवारपासून निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


संबंधित बातम्या : 


VIDEO - यांना कसं आवारणार? ठाण्यातल्या मुंब्रा बायपासवरील धबधब्यावर प्रचंड गर्दी


राज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?


Covid​​​​-19 : तिसऱ्या लाटे आधी मुलांची लस येणार? उत्पादन सुरू झाले, क्लिनिकल चाचणीची तयारी