Pune News in Martahi : पुण्यातील एका धक्कादायक घटनेने सर्व परिसर सुन्न झाला आहे. लहान मुलांना जत्रेमध्ये जाण्याचं आकर्षण असतं. त्यामुळे पालक मुलांच्या आनंद द्विगुणीत करण्यासाठी परिसरातील जत्रेत घेऊन जातात. पण पुण्यातील एका जत्रेत पालकांवर आनंदाऐवजी दु:खचं डोंगर कोसळलंय. पुण्यात आकाश पाळण्यात बसताना शॉक लागून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या कात्रज परिसरात ही जत्रा भरविण्यात आली होती. (9 year old boy died of electric shock at funfair in katraj funfair Pune News in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने पुण्यात फनफेअर भरवण्यात आलीय. त्यावेळी आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार या 9 वर्षांच्या मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाला. त्या जाळीमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने गणेश पवार शॉक लागून जमिनीवर कोसळला. त्याला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फन फेअरचे आयोजक तसंच आकाश पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्ती करण्यात येत आहे. दरम्यान  शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशा मुळे झाला हे स्पष्ट होईल असं भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 


मुंबईत बागेत खेळताना शॉक लागून मुलाचा मृत्यू


पुण्यासोबत मुंबईतही (Mumbai News) अशी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील बागेत खेळत असताना विजेचा झटका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत मुलांच्या पालकांनी शनिवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वमधील आर्यवीर सोसायटीच्या तळमजल्यावर बागेत ही शनिवारी संध्याकाळी घडली आहे. बागेत मुलं खेळ असताना विजेच्या तारांचा संपर्क आल्यामुळे मुलाला जोरात शॉक लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. अजय चौधरी असं मृत मुलाच्या वडिलांचं नाव आहे. 


वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असतं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि काळजीवाहू यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ए) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल नोंदविण्यात आलाय. पुणे आणि मुंबईतील घटना ऐकून पालकांचे मन्न सुन्न झालंय.