उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रेटो यांच्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला. या वाद संपत असताना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. साहित्य संमेलनाला १५० ख्रिस्ती धर्मगुरु उपस्थित राहणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं हे साहित्य संमेलन आहे की, ख्रिस्त संमेलन ? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहू नका, असे आवाहन करणारं पत्र पुण्याच्या ब्राह्मण महासंघानं आपणाला पाठवलंय, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ साहित्यिक, कवी, पद्मश्री आणि संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनी केला आहे. 


फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे संमेलनाचे अध्यक्ष असल्याने आपण साहित्य संमेलनाला जाऊ नये, असं ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी मला फोन करूनही सांगितले. मात्र हा साहित्यिकांचा मेळा असल्यानं आपण संमेलनाला जाणार आहोत, असंही महानोरांनी झी २४ तासला सांगितले. 



या संमेलनाला संमेलनाध्यक्ष फादर दिब्रेटो उपस्थित राहणार की नाही ?, याबद्दल संभ्रम होता. त्यांना पाठदुखीचा त्रास होत होता. पण त्यांच्यावर उपचार झालेत. त्यामुळे ते आज संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 


संमेलनाध्यक्ष फादर दिब्रेटोंच्या अध्यक्षीय भाषणातअतिशय महत्त्वाच्या मुद्दयावर भाष्य करण्यात येणार आहे.