आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: आजकाल सापाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून महाराष्ट्रातही (Snakes in Maharashtra) असे अनेक व्हिडीओ तयार केले जातात आणि व्हायरल होतात. सोशल मीडियावर अशा व्हिडीओजना खूप पसंती मिळते. सर्पमित्र अनेकदा एकत्र जमतात आणि सामान्यांसाठी सापांबद्दल कायमच चांगली माहिती देत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला परत माणूस आणि प्राण्याच्या (Maharashtra News) नात्याबद्दल पुन्हा एकदा विश्वास बसेल. (a 12 foot python was found in mool taluka chadrapur now it in safe place)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला. इतका मोठा अजगर पाहून शेतात उपस्थित मजुरांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची चांदापुरच्या नागरीकांनी संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मय झिरे यांना दिली. तन्मय झिरे व वेदांत निकुरे यांनी चांदापूर गाठतअजगराला सुरक्षितपणे पकडले. या पकडलेल्या अजगराची लांबी अदांजे बारा फुट असुन वजन अंदाजे पंचेवीस ते तीस किलो आहे. वनविभागाच्या सहकार्याने अजगराला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


यापुर्वी सापडला होता 13 फूटांचा अजगर : 


नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय. वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन सर्पमित्र व प्राणीमित्र या संस्थेच्या सदस्यांनी या 13 फूट लांबीच्या अजगराला त्याच्या अधिवासात सोडले .रामटेक जवळील डोंगरी येथील सुनील नागपुरे शेतात धान कापत असतांना त्यांच्या पायाजवळ एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


साप अंगावर आला तर... 


नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण होय एक तरुण चक्क सापाच तोंड हातात पकडून रुग्णालयात उपचारासाठी पोहचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि सगळेच घाबरले. पण थांबा त्या तरुणाला साप चावल्यानं उपचार करताना सोप्पं जावं म्हणून चक्क रसल वायपर (russel viper) घेऊन तो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या शासकीय रुग्णालयात  पोहचला. पंकज सपाटे असे 37 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सध्या त्याचावर उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जातं आहे. सापाच तोंड हातात पकडून रुग्णवाहिकेतून 10 ते 15 मिनिटाचा प्रवास केला.