नागपूर : युट्युब पाहून तरुण काही ना काही उद्येग करत असतात परंतु या तरुणाने जो उद्योग केला आहे. याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. कारण या तरुणाने चक्क युट्यूबवर बघून बॉम्ब तयार केला आहे. नंतर तो बॉम्ब त्याला निकामा करता आला नाही म्हणून मग त्याने पोलिस स्टेशन गाठले. परंतु हा युट्यूबर पाहून बॉम्ब बनवणे त्याला महागात पडले कराण बॉम्ब बनवण्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरमधील राहुल पगाडे नावाच्या २५ वर्षीय तरुणाने युटूबवर व्हीडीओ पाहून स्फोटकांचा वापर करून एक बॉम्ब बनवला.  मात्र त्यानंतर त्याला तो बॉम्ब निकामी करता आले नाही, त्यानंतर काय करावे हे त्याले सुचले नाही म्हणून मग त्याने एक युक्ती लढविली. त्याने संबंधित बॉम्बच्या सर्किटची बॅग काल संध्याकाळी म्हणजेच शनिवारी नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये आणून दिली.


ही बॅग केडीके टी पॉईंट जवळ बेवारस आढळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या बॅगची तपासणी केली असता, त्यात इलेक्ट्रिक सर्किट आढळून आले. सोबतच मोबाईल बॅटरी, काही वायर्स चे तुकडे, एक लायटर, एक बल्ब आणि एक साधा कीपॅडचा मोबाईल अशा वस्तू त्यामध्ये आढळल्या. सोबतच एका कागदावर 'आय किल यु नागपूर केबीएमए' असे लिहिलेले होत. जे पाहिल्यावर नागपूर पोलीस  हादरले.


त्यानंतर लगेचच नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावले. त्याला निकामी करताना बॉम्ब शोधक पथकाच्या लक्षात आले की, यात कमी प्रतीच्या स्फोटकाचा वापर केला आहे. म्हणजेच हा बॉम्ब गावठी बॉम्ब आहे. तसे त्यांनी पोलिसांनाही कळवले.


त्यानंतर पोलिसांनी हे कोणी केले याचा शोध घेण्यासाठी त्यामुलाने दावा केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. परंतु त्यामध्ये पोलिसांना काहीही आढळले नाही. नंतर पोलिसांच्या लक्षात आले की हा सगळा प्रकार राहुलनेच केला असावा. त्यामुळे पोलिसांनी राहूलची उलट तपासणी करण्यास सुरवात केली.


त्यानंतर पोलिसांकडे राहूलने हे आपणच केले असल्याचे कबूल केले. त्यामुळे  बॉम्ब तयार करणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या आरोपाखाली राहुल पगाडे याला अटक केली आहे. सोबतच  'आय किल यु नागपूर केबीएमए' हा संदेश कोणाला उद्देशून लिहिले आहे याचा तपास सुरु केला आहे.