Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र, कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता या ठिकाणी  छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूच उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुतळा कोसळल्या नंतर या संदर्भात दोन कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. एक कमिटी पूर्वीच्या पुतळा दुर्घटना नेमकी कशी झाली याची चौकशी करणार आहे. तर, दुसरी कमिटी नव्याने पुतळा कशा स्वरुपाचा असेल, संदर्भात काम करणार आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा


पूर्वीचा महाराजांचा पुतळा 28 फुटांचा होता, आता 60 फुटांचा पुतळा उभारण्यात येणार. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे. गुजरातमधील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी जे निकष ठेवले होते, त्याच निकषांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे. 


निविदेमध्ये नामांकित शिल्पकार, विविध प्रकल्प सल्लागार, जेष्ठ इतिहासकार, कलाकार यांच्या शिफारशी व भारतात विविध ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांचा अभ्यास करून सर्वंकष अटी व शर्ती निविदेत अंतर्भूत केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आणि चबुतऱ्याच्या बांधकामासह एकूण निविदेची किंमत 20 कोटी इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 60 फुट उंचीचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा संपूर्णपणे ब्रॉन्झमध्ये असेल. पूर्णाकृती पुतळ्यासाठी संपूर्णपणे गंजरोधक स्टेनलेस स्टील, SS 316, 317 मध्ये सपोर्ट फ्रेमवर्क असेल.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चबूतरा RCC मध्ये असेल व त्यात पूर्णपणे स्टेनलेस


स्टील, SS 304 (पूर्णपणे गंज प्रतिबंधक) वापरले जाईल. अंतिम निवड करण्यात आलेला कंत्राटदार / शिल्पकार Structural Consultant कडून Structural
Design तपासून घेईल व त्यानंतर शासनाने नेमलेल्या Proof Consultant (IIT Mumbai) कडून Structural Design अंतिम केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे किमान आयुर्मान १०० वर्षे इतके असेल. ठेकेदारामार्फतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची व चबुतराची 10 वर्षे देखभाल दुरुस्ती असेल.