पुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
मुंबई : पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने कोविड उपचार केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात घडली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्याला कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. उपचार केंद्रात त्याच्यासोबत तीन रुग्ण होते. ते नास्ता करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. त्यावेळी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, नास्ता करण्यासाठी गेलेले रुग्ण परतले त्यावेळी रुग्णाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.