सोलापूर : Rada during the birthday celebration :वाढदिवस होता. मात्र, या वाढदिवसाला हाणामारीचे वळण लागले. दोन गटांत तुफान राडा पाहायला मिळाला. एकाला धक्का लागला आणि वाद उफाळला. वादाचे थेट रुपांतर मोठ्या राड्यात झाले. वाढदिवसाच्या दिवशी केक कापायचा सोडून दोन गटांत एकमेकांविरोधात तलवारी, काठ्या बाहेर काढण्यात आल्यात. यावेळी दोन गटांत जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिसरता तणावाचे वातावरण होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरातील भवानी पेठेत वाढदिवसाचे रुपांतर हे भांडणात झाले. यात दोन गटांनी एकमेकांना तलवारी, काठ्या आणि दगडफेक केल्यामुळे 10 ते 12 जण जखमी झालेत. या सर्वांना सोलापुरातील जिल्ह्या शासकीय रुग्णाल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


तक्रारदार सुधीर बिडगाव यांच्या घरासमोर आरोपी रमाकांत भालशंकर याने त्याच्या घरातील लहान मुलाच्या वाढदिवसासाठी स्टेज उभारला होता. यावेळी तक्रारदार याचा आरोपीच्या घरातील एकाला धक्का लागला आणि त्यावरुनच भांडण वाढले. हे भांडण इतके टोकाला   पोहोचले की तलवारी आणि काठ्यांनी हाणामारी सुरु झाली दगडफेकसुद्धा झाली. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.