सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे(Pune) मार्केट यार्डात या हंगामातील पहिली आंबा पेटी(box of mangoes) दाखल झाली आहे. या पेटीला आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला आहे. या पेटील तब्बल 41 हजारांची बेली लागली आहे. ही आंबा पेटी तब्बल 41 हजारांना विकली गेली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्याची ही आंबा पेटी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे मार्केट यार्डात या हंगामातील पहिली मुहूर्तपेटी दाखल झाली. 41 हजारांना लिवाव झालेल्या या पेटील 66 आंबा फळं आहेत. म्हणजेच याचा अर्थ एक फळ 621 रूपयांना पडलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल महिनाभर आधी आंबा पुणे मार्केटयार्डात दाखल झाला आहे.  त्यामुळे फळांचा राजा हापूस यंदा महिनाभर आधीच सर्व सामानांच्या आवाक्यात येऊ शकतो, अशी आशा आडते व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


सर्वसाधारण पणे अक्षयतृतियानंतर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतो. पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत या गंगामाचा पहिली आंबा दाखल झाला आहे. या आंब्यासाठी बोली लावण्यात आलेली होती. आतापर्यतची सर्वाधीक बोली यंदा लागली. तब्बल 41 हजार रुपयांनी पहिली आंब्याची पेटी विकली गेली. या पेटीत आंब्याचे 66 नग आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जयेश कांबळे या शेतकऱ्याचा हा आंबा आहे.