Nandurbar Accident News : नंदुरबारमध्ये विचित्र अपघात झाला आहे. एक उधळलेला बैल थेट कारमध्ये घुसला आहे. विशेष म्हणजे यावेळी कारमध्ये चालकासह इतर प्रवासी देखील बसले होते. या विचित्र अपघातामधून सहाजण सुखरुप बचावले आहेत. दरम्यान बराच वेळ हा बैल कामध्येच अडकेला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार जिल्ह्यात सध्या एका अजब अपघाताची चर्चा रंगली आहे. दामळदा ता.शहादा येथील उपसरपंच डॉ.विजय चौधरी व कुटुंबातील सदस्य कारमधून निघाले होते. त्याच वेळी एक उधळलेला  बैल आणि कारची काच फोडून थेट आत घुसला. मात्र दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण सही सलामत बचावले आहे. 


या घटनेची सोशल मीडियातून तसेच संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. तालुक्यातील आदर्श गाव दामळदा येथील उपसरपंच डॉ.विजय चौधरी कुटुंब हे शहादा येथील विवाह समारंभातून परत येत असतांना टुकी गावाजवळ टुकी बस थांब्याजवळ रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून डॉ चौधरी यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवली. 


गुरांच्या कळपातील उधळलेल्या एका बैलाने पुढील बाजूने कारवर चढाई केली. क्षणार्धात बैल पुढील काच फोडत थेट आत घुसला. मात्र, प्रसंगावधान राखत उपसरपंच डॉ.विजय चौधरी यांच्यासह कारमधील अन्य पाचही जण कारचे दरवाजे उघडून कारबाहेर निघाल्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेत उधळलेला बैल कार पुढील काच शिंगाने फोडून थेट कार मध्येच घुसला.


बैलाचे शीर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये तर अर्धे धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी भयानक स्थिती होती.हे दृश्य पाहणाऱ्याचा अंगावर शहारे आणणारे होते.जखमी झालेल्या सदर बैलाला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले.


शिंदे गटाच्या आमदाराच्या कारवर हल्ला


नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. एका लग्न सोहळ्यासाठी आमदार कल्याणकर गेले असताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. अर्धापूर तालुक्यातील देगाव एका विवाह सोहळ्यात सामील होण्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर गेले होते. यावेळी कार लग्न मंडप बाहेर पार्क करुन आमदार कल्याणकर विवाह सोहळ्यात गेले होते. त्यावेळी काही तरुणांनी दगड घालून. त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. मराठा आंदोलकानी त्यांची कार फोडल्याचे सांगण्यात येत आहे.