Bull Cart Race : कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही. टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इअर टॅग नसल्यास बैलाची खरेदी विक्री ही करता येणार नाही. इअर टॅग एक बारकोड पद्धती आहे, जी सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनावरांच्या कानाला लावण्यात आलेल्या या इअर टॅगची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती आठवडी बाजार खरेदी विक्री संघ यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना टॅग दिलाय का? यावर लक्ष द्यावे नसेल तर बंदी घालावी असं सांगण्यात आले.


1 जूनपासून इअर टॅग बंधनकारक असल्याचे शासनानेही परिपत्रक काढले. मात्र, बैलांच्या कानाला टॅग मारण्यास बैलगाडा मालकांनी विरोध केलाय. बैलाच्या कानाला टॅग मारल्यास त्याचा परिणाम बैलाच्या धावण्यावर होऊ शकतो. त्यामुळे शासकीय नियमाने बैलाच्या गळ्यात टॅग लावू मात्र कानाला टॅग मारणार नाही अशी भूमिका   बैलगाडा मालकांनी घेतली.


बैलांच्या टॅग मारण्याला बैलगाडा मालकांचा थेट विरोध


बैलगाडा शर्यतीचा बैल हा खिल्लार जातीचा असतो. बैलांची ही जात चपळ आणि तेज नजरेचा असते शर्यतीवेळी हा बैल कान वर करुन नजर लावुन धावतो त्यामुळे बैलाच्या कानाला टँगिन केलास त्याचा थेट परिणाम  बैलाच्या धालण्यावर होतो त्यामुळे बैलाच्या टॅगला विरोध नाही मात्र बैलाच्या कानाला टॅग मारण्यासाठी विरोध असून शासकिय नियमाने बैलाच्या गळ्यात टॅग लावु अशी थेट भुमिका बैलगाडा मालकांनी घेतलीय त्यामुळे बैलगाडा शर्यतबंदी नंतर जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बैलगाडा मालक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष पहायला मिळणार आहे.