Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे.  यवतमाळ मधील पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. देशद्रोहाच्या कलमाअंतगर्त हा गुन्हा दाखल झालाय. संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप नितीन भुतडा यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. देशविरोधी लिखाण केल्याचाही आरोप देखील भुताडा यांनी केला आहे. 


खासदार संजय राऊत यांच्या विरोधात यवतमाळच्या  उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी लिखाण केल्याचा व देशाचे पंतप्रधानांची बदनामी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.  कलम 153_A 505(2) आणि 124 - A नुसार खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे.  यापूर्वी 2022 मध्ये पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. तब्बल 102 दिवस संजय राऊत मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये होते. यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.  


भाजप नेते प्रसाद लाड संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार


भाजप नेते प्रसाद लाड संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी लाड २०० ते ५०० कोटींचा दावा करणार आहेत. यासंदर्भात संजय राऊतांवर बोलताना लाड यांची जीभ घसरलीय... प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीत हजारो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. 


संजय राऊतांच्या कारवर चप्पल फेक


संजय राऊतांच्या कारवर चप्पल फेकण्यात आली. 10 डिसेंबर रोजी सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांच्या कारवर चपलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आली.  संजय राऊत कारमध्ये बसून जात असताना हा प्रकार घडला. चप्पल फेकीनंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते पसार झाले.