नंदूरबार : धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचे दर्शन आज झाले नाही. या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.


पारा ३८ अंशापर्यत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात तापमानाचा पारा ३८ अंशापर्यत गेला होता.  मात्र सकाळपासून धुळे आणि नंदूरबार शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 


गारपीठ, अवकाळी पावसाचा इशारा 


कुलाबा वेध शाळेने धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात येत्या ४८ तासात गारपीठ आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा आणि संभाव्य गारपीटीपासून बचाव करण्यासाठी उपाय योजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मागच्या आठवड्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.