Central Railway : मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. कल्याण स्टेशन जवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला आहे. यामुळे प्रवासी गोंधळले. डब्या घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरु आहे. टिटवाळाहून मुंबई कडे अर्थात CSMT च्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा डबा घसरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ दोन नंबर प्लॅटफॉर्मजवळ हा डबा घसरला. या लोकलचा शेवटचा डबा घसरला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी तसेच प्रवाशांना इजा पोहचलेली नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. 


कल्याण सेक्शनचे रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. लवकरच डबा पुन्हा रुळावर आणण्यात येईल. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी दुसऱ्या ट्रॅकवरुन लोकल सोडण्यात येत आहेत.