सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : विठू माऊलीच्या दारातच वारकऱ्याला मरण आले आहे (Vitthal Rukmini temple).  पंढरपूरच्या विठ्ठल रुक्णीणी मंदिरात (Vitthal Rukmini temple of Pandharpur) प्रदक्षिणा घालत असतानाच या वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. एकदशि दिवशीच मंदिराजवळ त्याला मृत्यूने गाठले आहे (heart attack). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाशिव महादेव बारड (वय - 55  वर्षे) असे या वारकऱ्याचे नाव आहे. सदाशिव हे राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी मधील राहणारे आहेत. एकादशीदिवशी ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. पंढरपुरात एकादशीदिवशी मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. 


सदाशिव बारड हे अनेक वर्षापासून विठ्ठल भक्त होते. मागील अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी करत येत होते.  दरवर्षी प्रमाणे ते यंदाही शनिवार  28 जानेवारी 2023 रोजी पंढरपूरला आले होते.  पंढरपुरात आल्यापासून नित्यनेमाने दर्शन, पूजा व प्रदक्षिणा हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. याच पद्धतीने बुधवारी सकाळी माघ एकादशी दिवशी सदाशिव बारड  मंदिराची प्रदक्षिणा घालत होते.


प्रदक्षिणा घालत असताना अचानक त्यांना चक्कर आली. सदाशिव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तात्काळ पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.


 एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, सदाशिव यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.