सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. पण, प्रेमात त्रिकोण असेल तर विषय अवघड होऊन जातो. सोलापुरमधील अकलूज(Akluj in Solapur) येथे अनोखा विवाह सोहळा पहयला मिळाला. दोन जुळ्या बहिणींनी( twin sisters ) एकाच मुलाची लग्न केलं आहे. यामुळे आता या दोघी एकाच मुलासोबत एकत्र संसार करणार आहेत. या अजब गजब लग्नाची(marriage) सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरमधील अकलूज तालुक्यातील माळशिरस इथे या जुळ्या बहिणीनीं लग्न सोहळा पार पडला. या दोघींनी एकाच मुलाशी लग्न केल आहे. पिंकी आणि रिंकी अशी या  जुळ्या बहिणींची नावं आहेत. दोघीही उच्च शिक्षित आहेत.


सहा महिन्यांपूर्वी पिंकी,रिंकी आणि त्यांची आई आजारी पडली होती.  अतुल नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरने जुळ्या बहिणींची रुग्णालयात काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले दोघींनी अतुलसह लग्न करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. या अनोख्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.