चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या शेतातही आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक प्रयोग आपल्याला ठाण्याच्या मुरबाड येथे पाहायला मिळेल. सध्या एका हुशार शेतकऱ्यानं सॉलिड देशी जुगाड केला आहे. या शेतकऱ्यानं टाकाऊ साहित्याचं उपयोगी वस्तूमध्ये परावर्तन करून एक आगाळावेगळा (Experiment) प्रयोग केला आहे. त्यानं घरगुती साहित्यातून भात मळणी (threshing) यंत्र तयार केलं आहे. (a farmer from murbad innovates threshing technique for rice farming)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शेतकऱ्यांची अवस्थाही फार बिकट आहे. त्यातून चांगला पाऊस पडूनही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. मजुरांच्या तुटवड्यामुळे भातशेती करणे खर्चिक होऊन बसले आहे. त्यात यंत्रांच्या वाढत्या किमती यांमुळेही अनेक शेतकरी त्रासलेले आहे. या सगळ्याला पर्याय म्हणून मुरबाड तालुक्यातील धसई (dhasai) गावातील शेतकरी अविनाश घोलप यांनी घरातील पत्र्याचा ड्रम, लोखंडी रॉड आणि 4 एचपीची मोटर या साहित्यातुन कमी खर्चात घरगुती भात मळणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सध्या तालुक्यात उत्सुकतेचा विषय ठरलं आहे. 


हेही वाचा - Alexa आता संस्कृतमध्ये बोलणार? केंब्रिज विद्यापिठाच्या तरूण शास्त्रज्ञानं लावला शोध



काय आहे या यंत्रांची (technique) खासियत? 


या देशी जुगाडातुन एका व्यक्तीला भाताची मळणी अगदी सहज करता येते. विजेच्या बिलातील किरकोळ वाढ वगळता देखभालीसाठी अन्य फारसा खर्च लागत नाही. अवघ्या एका महिन्यात घोलप यांनी हे यंत्र तयात केले आहे. घरातील टाकाऊ पाण्याचा ड्रम त्यात लोखंडी रॉडला मोठे लोखंडी नाटबोल्ट (Natbolt) वेल्डिंग केले आहे. हा रॉड पत्र्याच्या ड्रममध्ये लावला असून हा रॉड फिरला की वेल्डिंग केलेले नटबोल्ट भाताच्या पेंडीवर आपटून झोडले जातात अशी त्याची रचना बनवली आहे. गोलाकार ड्रम (drum) एक बाजूला पेंडी टाकण्यासाठी मोकळी ठेवली होती. त्याला 4 एचपीची मोटर बसवण्यात आली. मोटारच्या लोखंडी रॉडला (rod) बसवून त्याचा पट्टा झोडणी यंत्राच्या शाफ्टला जोडला. मोटर सुरू केली की शाफ्ट जोराने फिरतो आणि भात झोडले जाते. या यंत्राच्या एका बाजूला लावलेल्या फॅनमुळे पेंढीचा तूस किंवा गवताचे तुकडे (grass) शाफ्टच्या वाऱ्याने आपसूकच वेगळे होतात. घोलप यांनी बनवलेले हे यंत्र पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.