अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या सगळीकडेच चोरीची प्रकरणे समाजात वाढू लागली आहेत. त्यामुळे सगळीकडेच फारच चिंतेचे वातावरण आहे. आता फक्त पुरूषच नाहीत तर स्त्रियाही प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. मग त्या चोरीच्या बाबतीत कुणाच्या मागे का राहतील? होय, सध्या अशाच एका महिलांच्या टोळीनं सगळीकडेच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतो आहे. या महिलांनी एका मोबाईल टॉवरवरच्या (women stealing) वस्तू चोरी करण्याचं धाडस केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की साधारण पाच - सहा महिलांची ही टोळी (women gang) आहे जी एकामागून एक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चालताना दिसत आहेत. त्यांच्या हातात भरपूर वस्तू असल्याचे दिसून येते आहे. किंबहूना त्या त्या गोष्टी कुठेतरी लपवू पाहण्याच्या तयारीत दिसत आहेत. हा व्हिडीओ (video) पाहून तुमच्या डोळयांवर तुमचा विश्वासच बसणार नाही. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळी सीसीटीव्ही (cctv footage) चित्रित झाली आहे. सात जणांची महिलांची ही टोळी योगेश्वर नगर येथून 17 लाखांचे मोबाईल टॉवरचे साहित्य चोरताना सीसीटीव्ही दिसत आहे. योगेशवर नगर येथील रहिवासी अक्षय इलमे हे मोबाईल टॉवर मेंटेनन्स चे काम करतात. त्यांच्या घराच्या बाजूला टीनाच्या पत्रांच्या शेड आहे. 



पाहा किती लाखांची रक्कम गेली चोरीला : 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


त्यात ते टॉवर मेंटेनन्सचे सामान ठेवतात. 2 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेड उघडल्यास त्यांना रेडिओ रिमोट हेडचे 26 नग गायब असल्याचे आढळून आले. त्याची किंमत 18 लाख 20 हजार इतकी होती.यावेळी त्यांनी सीसीटीव्ही तपासले असताना त्यांना काही महिला त्या साहित्याची चोरी करत असताना दिसून आल्या.त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे.