मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. परीक्षा रद्द केल्याने आणि लॉकडाऊनवरुन त्यांनी सरकारवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, '10 वी आणि 12 वीच्या परीक्षा महत्वाच्या आहेत. सरकार परीक्षा रद्द करणार असेल पुढे ऍडमिशनसाठी इतर परीक्षा होतात हे आधी सरकारने स्पष्ट करावं. मूल्यांकन कसं करणार हे स्पष्ट करावं.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विद्यार्थ्यांची आपल्याच शाळेत परीक्षा घेता येईल सर्व सुरक्षेचे उपाय करावे, सरकारकडे कल्पकता नाही. 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं सरकार वाटोळं करत आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही. पालकांनी आंदोलन करावं.' अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. (prakash Ambedkar on Lockdown and Exams)


'पूर्ण शाळा 10 वीच सेंटर करा. विद्यार्थ्यांना भविष्य ठेवलं नाही, अशा सरकारने राजीनामा द्यावा. FM radio वापरला असता तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं असतं. परीक्षा घेण्याबाबत नक्की अडचण काय आहे हे सरकारने आधी सांगावे. राज्यपाल नियुक्त आमदार नॉमिनेट करण्याचा अधिकार राज्यपालांना, त्याच जर कोणी उल्लंघन केलं असेल तर राज्यपालांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे.'


'सोशल मीडियाला नियंत्रित करण्यापेक्षा नागरिकांना आवाहन करावं की स्वतः सेल्फ कंट्रोल राहावं. मुख्यमंत्री कोणालाही भेटत नाही. सुप्रीम कोर्टचा निर्णय यावर सरकारने नवा मार्ग काढायला पाहिजे होता.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.