Nalasopara: सध्या जिमचं महत्त्व (Gym news) सगळीकडेच वाढू लागलं आहे. त्यामुळे तरूणांपासून ते तरूणींपर्यंत जिममध्ये सगळेच गर्दी करताना दिसतात. योगा नाहीतर जिमची जीवनशैली (Gym and Lifestyle) आज सगळ्यांची आहे. लहान मुलेही आता व्यायामाचं महत्त्व जाणून आहेत. वयस्कर लोकंही आज योगा (Yoga) करताना दिसतात. डान्स आणि जिमचं महत्त्व एकीकडे वाढताना दिसत असलं तरी जिम करताना किंवा केल्यावर व्यक्तीचा मृत्यू झाला अशा बातम्याही समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडे याच काही प्रकारांनी सर्वसामान्य जनताही खूप सतर्क आणि घाबरून आहे असं चित्र समोर येतं आहे. त्यातून अशा बातम्या समोर येत असतात. आता आणखीनं एका बातमीनं (shocking news in nalasopara) सगळीकडे खळबळ माजवली आहे. (A gym trainer died due to suffocation in Nalasopara unfortunate death Thane News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपाऱ्यात एका जिम ट्रेनरचा (gym trainer death) श्वास कोंडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आहे. नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास विनायक जाधव (वय 35) याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच बिल्डिंग मधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये (gym trainer admitted to hospital) उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.


याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जीम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील 'द फिटनेस कार्डेस' या जिम मध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  


हेही वाचा - HR Executive तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, धक्कादायक प्रकार समोर


जिम ट्रेनर्सच्या मृत्यूत का होतेय वाढ? 


सध्या एकीकडे जिमचं महत्त्व वाढ जात असताना जिममध्ये मृत्यूचं प्रमाणही वाढले आहे. जिम ट्रेनिंग देणंही काहींना आता जीवघेणं ठरू लागलं आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा एकदा त्या घटनांकडेही लक्ष वेधले जात आहे. जिममध्ये काम करणाऱ्या फिटनेस ट्रेनर्सच्याही मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. जिममध्ये वर्कआऊट करतानाही अनेक दिग्गज आणि लोकप्रिय सेलिब्रेटी हे मृत्यूच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे सगळ्यांसाठीही महत्त्वाचे ठरले आहे.