कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. शुभमला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होत. यानंतर काही दिवसांनी एका मांजरीने त्याचा चावा घेतला. मात्र शुभमने किरकोळ समजत या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केलं. मात्र अखेर त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. गंभीर घटनांना किरकोळ समजणं ही शुभमची सर्वात मोठी चूक ठरली. दरम्यान या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे


नेमकं काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारत राहत शुभम आपल्या कुटुंबासह राहत होता. शुभमचे वडील घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात कामाला आहेत. शुभमने शिक्षण पूर्ण केलं असून नोकरीच्या शोधात होता. दोन महिन्यापूर्वी शुभम रात्री खाली फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमचा चावा घेतला. हा चावा किरकोळ असल्याचे समजून शुभमने उपचार केले नाहीत. 


त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याचा एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याचं समजून त्याने उपचार केले नाहीत. पण 10 डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार घेत असताना 12 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता मृत्यू झाला