सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक; सध्या चोरीच्या घटना अनेक ठिकाणी घडताना दिसत आहेत. किंबहूना अद्यापही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. हे प्रकार आजही घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याने सगळीकडे कायमच भितीचे वातावरण असते. त्यातून बॅंक (Bank) किंवा त्यासंबंधी काही भयंकर घटना घडू लागल्या तर आपण अधिकच काळजीत पडतो. सध्या असाच एक प्रकार स्टेट बॅंकेत (State Bank of India) घडला आहे. त्यातून सगळीकडे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. हा प्रकार नाशिकमध्ये घडला असून नागरिकांमध्ये चितेंचं वातावरण आहे. (a man grabs 17 lakhs rupees from state bank of india in nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँकेतील कॅशिअरजवळून (Cashier) चाेरट्याने 50 लाखांपैकी 17 लाख रुपये अलगद चाेरुन नेल्याची घटना नाशिकच्या फाटा परिसरात घडलीये. चाेरट्याने नाेटांच्या बंडलामधील 17 लाख रुपये अर्धा ते एक मिनिटांत चाेरुन नेले. हिशेब लागत नसल्याने सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक चाेरटा पैसे घेऊन पळून जाताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून ही चाेरी केली आहे. 


विशेष म्हणजे बँक व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही राेकड लंपास (Theft in bank) झाल्याचा आराेत हाेत असून पंचवटी पाेलिसांनी सीसीटीव्ही (CCTV Footage) फूटेजनुसार चाेरट्याचा तपास सुरु केला आहे.  पंचवटीतील पेठ फाटा येथील भारतीय स्टेट बँकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी यांनी पंचवटी पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, एसबीआय बँकेची पेठफाटा येथे शाखा आहे. बुधवारी  या शाखेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी कॅश काऊंटरमधील जमा केलेली 50 ते 55 लाख रुपयांची रोख रक्कम मोजून टेबलावर ठेवलेली होती. 


दुपारी दीड वाजेच्या सुमारास बँकेत ग्राहक बनून आलेला संशयित भामटा बँकेच्या परिसरात रेंगाळत होता. त्याने बँकेतील कर्मचारी आपआपल्या कामात गुंग असल्याचे बाब हेरली आणि बोडके यांनी काढून ठेवलेल्या रोकडपैकी 17 लाख रुपयांची रोकड त्याच्याकडील पिशवीत टाकून पळ काढला.