तुषार तापसे, झी मीडिया, सातारा : हल्ली गावागावात मंदिरात चोरी (Mandhardevi Mandir) करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून हल्ली सीसीटीव्ही कॅमरे (Camera) असतानाही अनेक चोरटे बिनधास्तपणे चोरी करताना दिसतात. त्यामुळे हल्ली सगळीकडेच याबाबत खबरदारी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांढरदेव मंदिरात दानपेटी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे या (Viral Video) व्हिडीओवरून एकच खळबळ माजली आहे. (a man tries to steal money donate box cctv camera captures)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील मांढरदेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झालाय. एका चोराकडून हा प्रयत्न करण्यात आला मात्र दानपेटी फोडताना आवाज झाल्याने त्याला त्या ठिकाणावरून पळ काढावा लागला आहे. हा चोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही (cctv camera) कॅमेरात चित्रित झाला आहे. या मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक असताना हा सगळा प्रकार घडला आहे. या चोराने वापरलेली हत्यारे पोलिसांना सापडली असून पोलिस त्याचा शोध घेतायत. हे सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  


viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!


व्हायरल व्हिडीओनं वातावरण चितेंत : 


या व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक इसम आपलं तोंड झाकवून दानपेटीच्या इथे येतो. दानपेटीला कुलूप असल्याने त्याला ती पेटी फोडताना त्रास होतो. त्यामुळे त्याला ती पेटी फोडताना येत नव्हती. बराच वेळ प्रयत्न करूनही त्याचे प्रयत्न निष्फळ होत होते.



मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!


मध्यरात्री घडली घटना: 


शेवटी त्याला कुठलातरी जोरात आवाज आला आणि त्यानं तिथून पळ काढला. ही घटना मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे मांढरदेवी मंदिरातील परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या अशा प्रकारांना आळा घालणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारांमुळे सगळीकडे चितेंचे वातावरण पसरले आहे.