मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

पीडित तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रंसोबत एका फार्म हाऊसवर (Fram House) पार्टी करण्यासाठी गेला होता. 

Updated: Nov 4, 2022, 06:12 PM IST
मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना! title=

अतीश भोईर, झी मीडिया, डोंबिवली: सध्या समाजात अनेक गुन्हे घडत आहेत त्यामुळे गावागावात शहराशहरात दहशत निर्माण झाली होते. यामुळे सध्या (Crime News) अशा प्रकारांना आळा घालणंही बंधनकारक झालं आहे. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवलीतील एका इंजिनिअरिंगचेच्या (engineer students news today) विद्यार्थ्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले.इतकेच नाही तर तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या कडून 40 लाखांचे दागिने (Gold Jewel Price Today) उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (friends make inappropriate video of a boy crime news in pune)

कोल्हापूरमधला धक्कादायक प्रकार: 

पीडित तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रंसोबत एका फार्म हाऊसवर (Fram House) पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी पिडीत तरुणाच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रींक्समध्ये गुंगींचे ओैषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हीडीओ काढले. त्यानंतर हा व्हीडीओ व्हायरल करण्याचे धमकावत त्याच्याकडून 40 लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

कसा घडला प्रकार: 

हे कृत्य करणारे पिडीत तरुणाचे मित्रच होते. त्यापैकी एकाला डोंबिवली (Dombivali) टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव संजय राजपूत असे आहे. तो कोल्हापूर येथील इचलकरंजी येथे राहणार आहे. या प्रकरणीत आणखीन किती जणं सहभागी आहे.त्यात त्यांचा काय सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून (Police) त्याचा तपास सुरु आहे. तपासासाठी टिळक नगर (Tliak Nagar) पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपींच्या जाब जबाबात तफावत येत असल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याने पोलिसांनी सांगितले. तर याबत पोलीस कॅमेरा (Camera) समोर बोलण्यास नकार दिलाय.