Say no to abuse:  रागाच्या भरात किंवा भांडक झाल की आधी शाद्बिक हल्ला होता. भांडणाची सुरुवात ही शिव्या देऊनच होते. रस्त्यावर, ट्रेनमध्ये, घरात किंवा कुठेही भांडण झाले की तोंडून पहिल्या शिव्या बाहेर पडतात. भांडणात अनेक जण आई बहिणीवरुन शिव्या देतात. महाराष्ट्रातील या गावात नवा नियम लागू होणार आहे. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारहाणीपेक्षा शब्दांचे घाव अधिक धारधार असतात. शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे. सौंदाळा गावचे सरपंच सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केल्याची माहिती दिली. ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला. या नियमानुसार शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. महिलांच्या सन्मान आणि स्वाभिमानाच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 


सौंदाळा हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. नेवासा तालुक्यात प्रतिष्ठित शनि शिंगणापूर मंदिराजवळ हे गाव आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 1800 आहे. 2007 मध्ये सौंदाळा या गावाला तंटामुक्त गाव म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.


एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 294 नुसार दंडनीय गुन्हा आहे. या कलमात दोन्ही पक्ष तडजोडही करू शकत नाहीत. कारण गैरवर्तन केल्याने केवळ पीडित पक्षाचेच नाही तर संपूर्ण समाजाचे नुकसान होते. त्यामुळे या प्रकरणात जामीनही देता येत नाही.