यवतमाळ : यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा कोरोनाचा नवा विषाणू अँटीबॉडीजनाही चकवा देत असल्याचं उघड झालंय. अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाचा पुन्हा वेगाने प्रसार होतोय. राज्यात २४ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यातून प्रत्येकी चार आणि पुण्यातून १२ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. यापैकी अमरावती, यवतमाळ आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या सँपल्समध्ये वेगळं म्युटेशन आढळलं. अमरावतीत E484K हे म्युटेशन आढळलंय. 



तर यवतमाळमधील सँपल्समध्ये N440K हा आंध्रप्रदेशात आढळणारा म्युटेशन सापडलाय. हे दोन्ही प्रकार अँटीबॉडीजना चकवा देतात. दिल्लीत ज्या रूग्णांना कोरोनाची पुन्हा लागण झालीय त्यांना या प्रकाराची लागण झालीय. तर साताऱ्याच्या सँपल्समध्ये V911I हा नवा प्रकार आढळला आहे. 


मात्र याचे फारसे रेफरन्सेस आढळत नाहीत. मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे भारतात आढळणाऱ्या A2 टाईपचेच हे कोरोनाचे प्रकार आहेत. ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका स्ट्रेन मात्र या सर्व 24 सँपल्समध्ये आढळले नाहीत.



कोरोनाबाधितांची संख्या वाढली 


राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे. तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत. राज्यात काल 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ कमी होत होती. पण आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्य़ाने राज्यातील प्रशासन चिंतेत आहे. 


सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे.